Bachelors and Boomers



बॅचलर्स आणि बूमर्स 


Bachelor: an unmarried young human being

Boomer: Google it. Interesting.
असं explain करायला अवघड आहे, शक्यतो लेख वाचून झाल्यावर लक्षात येऊन जाईल.

अत्यंत महत्वाची टिपणी:

सगळेच जन boomer असतात असं नाही, हा लेख काही जणांना लक्षात ठेवता लिहलेला आहे(out of personal experience). ज्यांना हा लेख पटत नाही, तर न पटू देत. move on, life is beautiful.
या लेखातील सर्व पात्र काल्पनिक आहेत.
काही उदाहरणं मुद्दाच स्वरूप दर्शवण्याहेतू वापरली आहेत, काही सत्य आहेत. हा लेख पुणे specific नसून इतरत्र ठिकाणं ही लक्षात ठेवता लिहला गेला आहे, पण पुण्याबद्दल वेगळीच आपुलकी आहे.
कुठे 'न' ऐवजी 'ण', पहिला उकार/वेलांटी ऐवजी दुसरा उकार/वेलांटी झालं असेल तर क्षमश्व.

मी एक बॅचलर आहे आणि पुण्यात राहते, माझं घर नाही इथे तर अर्थातच भाड्याने रहावं लागतं , माझ्या सारख्या बऱ्याच जणांना. पुण्यात जागो जगी "या बिल्डींग मधील सदनिका फक्त मुले व मुली (बॅचलर )ला भाड्याने देऊ नये", "बॅचलर्स नॉट अलाऊड" अशा पाट्या दिसतात (पुणेरी पाट्या नेहमीच कुतुहलाचं विषय असतात). पुणे च म्हणून नाही, इतर ठिकाणी ही असं काही होत असावं, पण मी इथे च राहून अनुभवलंय तर इथलंच सांगते.
माझ्या माहितीप्रमाणे, कारण हे असावं, की काही बॅचलर्स च्या parties, loud music, व्यसन करून गोंधळ घालणे इ. गोष्टींमुळे सोसायटी मध्ये राहणाऱ्या इतर families ला त्रास होत असावा. मान्य केलं.

काही बॅचलर असं करत असतील, तर त्यांना सांगा, जसं तुम्ही इतर कुठल्या शेजाऱ्यांना (जे married असतात आणि फॅमिली म्हणून accepted असतात as per society norms) सांगितलं असतं, तोंडावर हसु, बांधा वाकलेला (नम्रपणा घळघळून वाहत असलेली काहीशी body langauge), कधी कधी हाताची घडी ही घातलेली असते,किंवा खूप च वाईट संबंध असतील तर society secretary कडून संदेश पोचता होतो, अगदी च त्यांचा धर्म/खानपान/कपडे/वर्ण/car/कुत्रा/खिडकीच्या पडद्यांचा color असं काहीही नावडत असेल तर भांडण(followed by अबोला कायमचा).

आपल्याकडे बॅचलर म्हंटलं की alien species, बॅचलर च घर म्हणजे फॅमिली नसतेच, अस गृहीत च धरून चालतात. बॅचलर फक्त ऑफिस /कॉलेज ला जातात , तिकडून आले की त्यांच्या अगदीच "अस्वछ" घरात खिचडी बनवून खातात, काही तरी व्यसन करतात आणि कधी कधी noveg खातात, विरुद्ध लिंगीय व्यक्तीस राहण्यास आणतात, ते ही रात्री, म्हणजे all and all, असं सगळं जे आपल्या संस्कृती चा सर्वनाश करतं ते सगळं म्हणजे फक्त बॅचलर च करतात, हो की नाही?

कधी शेज़ारच्या अमुक काकांच्या घरी जोरजोरात सासू-सुनेचं भांडन होतं हो, पन तो गोंधळ असं म्हणता नाही येनार, तो त्यांचा कौटुंबिक मुद्दा, नवरा बायकोवर हात उचलत असेल तर आहेच ती बाई चावट केलं असेल अगावपणा काहीं, असो, आपण घराचा दरवाजा लावून crime patrol पाहू आणि सुजाण नागरिक असण्याचं कर्तव्य पार पाडू. कधी शेजारच्या बंट्याचा वाढदिवस असेल, एक गावभर लोकांना आमंत्रण असेल आणि त्यामुळे corridor floor वर सगळा चिखल माखला गेला असेल, तर ती अस्वच्छता म्हंटलं तर किती ते पाप, एका गोंडस मुलासाठी केलेलं family function ते. असेच बिल्डिंग मधले तमुक वयस्कर काका, जे लिफ्ट मध्ये येता-जाता भेटत असतील,एक बॅचलर मुलगी पाहुन तिच्या चार चौकश्या करत असतील जरी ती मुलगी त्या conversation मधे interested नसेल तरी, तर हे जबरदस्तीचं interrogation अजिबात च नसून, त्या मुलीचा security चा प्रश्ण आहे, आणि तमुक काका खुप च सज्जन आहेत, त्यांनी फक्त वयानी मोठे असल्याने(ते ही विवाहीत) respect हे default कमवलंय.

दिवाळी मधे कधी बसने प्रवास केलाय? नक्की करा. अशी रिकामी बस कधीच भेटणार नाही. एकदा मी बावधन ते कोथरूड ११० मधे असताना, २ भगिनी संवाद साधत होत्या. त्यांच्या मते पुण्यात बॅचलर लोकांची अफाट गर्दी झालीये, किती छान वाटतं हे सर्व लोक त्यांच्या मूळ गावी गेले की, इ. लोकांच्या गरजेनुसार public transport बदललं पाहिजे हे त्यांना फारच काल्पनिक वाटलं असावं, म्हणून त्यांनी हा गर्दी वाढवण्याचा आरोप "बाहेरच्या" लोकांवर लावला असावा.

त्यांना असं अजिबातच वाटलं नसेल का की आज पुण्यात हजार नसतील तरी समझा, शेकडो तरी मेस/पोळी भाजी केंद्र/थाळी गृह/खानावळी इ. आहेत ते कोणामुळे चालतात? प्रत्येक गल्ली-बोळात जे paying guest/hostel/ढेकणांनी भरलेले HK फ्लॅट्स हे कसे कटले असते? प्रत्येक main road वर एक अमुक-तमुक अमृततुल्य चहाचा उदघाटन सोहळा कसा पार पडतो? Crishtmas सारख्या occasions ला gift shop तुडुंब bharun कसे वाहतात? पण असो, हे तर फक्त माझं क्षुल्लक निरीक्षण आहे. चित्र काही अजून चांगलं असतं जर "बाहेरचे लोक" इथे नसते आले कामाला आणि शिकायला. तसं माझं geography कच्च आहे, मला बाहेरचे म्हणजे कोण हे कळत नाही आणि कळवून घेऊन इतकं ज्ञानवंत व्हायचं ही नाही.

काही वर्षांपूर्वी, कात्रज ते नळ स्टॉप, असा माझा आणि माझ्या मैत्रिणींचा रोजचा उपक्रम"up down" असायचा. हिंजेवडी बस नेहमीच खचाखच भरलेली असे. त्यात सलग एक अठवडा तरी काही नेमके चेहरे रोज दिसायचे. एके दिवशी काही बूमर काका काकूंना खूपच रहावलं नाही आणि त्यांनी सामाजिक भावने मधे वाहून गर्दी वाढण्यास कारणीभूत असलेल्या बॅचलर लोकांवर टिपणी करण्यास सुरुवात केली,ofcourse एकमेकांसोबत. students नि इतकी मोठी दप्तरं आणल्यामुळे, खूप संख्येत students वाढल्यामुळे,अमुक तमुक कारणांमुळे गर्दी वाढतेय असे बरेच तर्कवितर्क निघत होते.

सहसा लोक आपला stop येणार असेल तर आधीच पुढच्या प्रवास्यांना बाजूला करून पुढे जाऊन थांबतात (मी म्हणते उगीच का इतके कष्ट). बूमर काकांचा stop आला, मग ते होते in middle of the bus, घाई घाई ने उतरायला पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागले, पुढचे लोक ही उतरत होते, त्या उतरणाऱ्या लोकांच्या immeditate मागे असलेले लोक मुर्खासारखे next immediate stop ची वाट पाहत रांगेत उभे होते.

काकांना अपेक्षित असेल की या मूर्ख लोकांनी पटकन बाजूला सरकून मला जागा द्यायला हवी, भलेही मी टिपण्या करण्यात वेळ घालवून पुढे जाऊन थांबायचं विसरलो. या सर्व हाल अपेक्षा त्यांना सहन नाही झाल्या आणि त्यांनी काळाचं भान ठेवत परत एक महत्वपूर्ण(पटकन खाली उतरण्या पेक्षा ही) टिपणी केली - "काय मूर्ख लोक आहेत, रस्ता पन सोडत नाहीत, भली मोठी दप्तर घेऊन चढतात". काकांच्या या टिपवणीवर मागून एक सहकारी बूमर काकुंनी पण प्रतिसाद दिला , "बघा ना, आणि शिकायला जातात म्हणे, गाढवासारखे वागतात तर". कसे बसे बूमर काका उतरून गेले होते. टिपनीकरण सुरूच होतं. तेवढ्यात सोनल hall चा माझा stop आला आणि almost सगळे बॅचलर तिथे उतरून गेले, सगळ्या "मूर्ख" students नी काही न बोलता माना खाली घालून आपला रस्ता कापण्यास सुरुवात केली, काही बोलणे हे फारच असंस्कारीपणाचे कृत्य ठरले असते. बस बरीच दूर जाईपर्यंत कल्लोळ ऐकू येत होता.

काही लोकांना हे पटणार नाही , तरी. वयाने लहान असलेली प्रत्येक व्यक्ती ही irresponsible, मूर्ख, बावळट, किंवा लावलेले आरोप सहन करून घेण्यासाठी नसते. त्याच बॅचलर व्यक्तीचं लग्न झालं की लगेच दुसऱ्या दिवशी ती responsible आणि सोज्वळ बनत नसते. Already married म्हणून तुमच्या सानिध्यात राहत असतील, तर ते ही खुप विद्वान नसतात.

वयाने मोठी असणारी प्रत्येक व्यक्ती जे बोलेल ते रामबाण नसतं. ते कोणाला पटलं नाही आणि त्यांनी त्या गोष्टीचा विरोध केला तर ती व्यक्ती असंस्कारी नसते किंवा बिनडोक ही नसते.

प्रत्येक वयस्कर व्यक्तीही boomer नसते, कोथरुड मधील ती २ वर्ष खुप विस्मरणीय असतील, माझ्या PG owner मुळे. कधी विनाकारण कसले ही बंधन लावले नाही.

तसेच तरुण वर्गातील काही लोकही बूमर नसु शकतात असं मुळीच नाहीं बरं का. पर्वाच काही तिशीत असणाऱ्या young ladies आमच्या घरात येऊन आमच्या security बद्दल concerned असल्याचे कळवून गेल्या. माहितीस्तव, या घराचे मालक म्हणजे माझ्या roommate चे parents,त्यांनी आम्हांला सांगायची गरज नाही पडली की आम्ही कसं राहायचं पण अखिल भारतीय बूमर संघटनेला वाटली. Birthday anthem आणि late night गप्पा मारण्याचं संशयास्पद काम केलं होतं आम्ही.

कोणास कितपत Respect द्यावयाची, हे फक्त वय या parameter वरुन ठरत नसते. दुसऱ्यांकडून respect कमवायला respectable कृत्य ही करावे लागतात ( विशेष म्हणजे give and take हे अश्म्युगकालीन तत्व काही लोकांना अजून ही समजत नाही ).
जिथे गरज नाही तिथे मोठे/family people असण्याचं publicly accepted certification दाखवूण उगाच टिपण्या करणे, समोरच्याला पटलं नाही तरी out of respect ऐकून घ्यावे अशी अपेक्षा ठेवणे हे कितपत पटतं तुम्हांला?

Family म्हणजे फक्त आई वडील मुलं बाळ आजी आजोबा या लोकांचीच नसते, समवयीन मुलं आणि मुलांची ही असु शकते, यांच्याकडे ही पाहुणे येऊ शकतात, राहु शकतात. या लोकांना ही privacy चा हक्क असतो, CCTV तर बाजारात ही भेटतात. आता माझी दुपारच्या झोपेची वेळ झाली आहे, इथेच संपवते.


- अशीच एक बावळट बॅचलर 




Comments